गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

मी आभाळ होईन...

 मी आभाळ होईन
नजरेत न मावणारं
तू अथांग सागर होशील का
जातीपातीच्या शृंखला तोडून
माझ्यात सामावून जाशील का
मी अभंग होईन तुकोबांचा
तू लेखणी होशील का
जाती पातीच्या भिंती तोडून
नवा इतिहास लिहशील का
मी झरा होईन झुळझुळणारा
तू बंडखोर नदी होशील का
मोह पाशाचे बंध तोडून
झाशीची राणी होशील का
मी ढाल होईन वार झेलणारी
तू तलवार होशील का
बलात्कार करणाऱ्या नराधमांचा
शिरच्छेद तू करशील का...
©सुरजकुमार निकाळजे

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

 खून करूनही महात्मा

कधी संपवता येणार नाही

माथे फिरुंच्या औलादिंना 

इतिहास  पुसता येणार नाही.००००

३१/०१/२०२५